bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00739
मूर्ती नसलेला तरीही विसर्जन होणारा आगळा वेगळा गणेशोत्सव

सध्या सार्वजनिक गणेशोत्सवाला उत्सवी आणि व्यापारी स्वरूप प्राप्त झाले आहे. दरवर्षी गणेशोत्सव मंडळांच्या संख्येतही वाढ होत आहे. मंडळांकडून बसविण्यात येणा-या उंच गणेशमूर्ती, त्यासाठी आणि सजावटीकरीता होणारा प्लास्टर ऑफ पॅरीस व थर्माकोलचा वापर यामुळे पर्यावरणाची समस्या निर्माण होत आहे. त्यासाठी आता पर्यावरणप्रेमी आणि समाजातील अन्य मान्यवरांकडून 'इको फेंडली' गणेशोत्सवाचा आग्रह धरण्यात येत असतो. हळूहळू का होईना आता त्याबाबत समाजात जागृती निर्माण व्हायला सुरूवात झाली आहे. परंतु अशा या 'इको फ्रेंडली' गणेशोत्सवाची सुरूवात अठेचाळीस वर्षापूर्वी करून एक नवा आदर्श आमच्या मंडळाने घालून दिला आहे. आमच्या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे गणेशोत्सवात गणपतीची मूर्ती नसते. तरीही अनंत चतुर्दशीला त्याचे आगळ्या पद्धतीने विसर्जनही केले जाते. लोअर परळ येथील गणपतराव कदम मार्गावर असणा-या आमच्या चाळीमध्ये गेल्या अठेचाळीस वर्षापासून हा आगळा गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. सर्व रहिवासी या उत्सवात सहभागी होत असतात. येथील चाळीमध्ये गेल्या अठेचाळीस वर्षामध्ये कधीही गणेशमूर्ती आणण्यात आलेली नाही. तर चाळीच्या इमारतीमध्ये एका मोकळ्या भिंतीवर गणपतीचे चित्र काढले जाते. चाळीतील रहिवाशी बबन कांदळगावकर यांनी ही प्रथा सुरू केली. विविध सणांच्या निमित्ताने कांदळगावकर हे चाळीच्या सूचना फलकावर चित्र काढायचे, एका वर्षी त्यांनी साध्या खडूने गणपतीचे चित्र काढले होते. त्यांच्यामुळे ही प्रथा सुरू झाली आणि आज इतक्या वर्षानंतरही ती सुरू आहे. एका विशिष्ट हेतूने त्या वेळी ही प्रथा सुरू झाली. काढलेल्या या चित्राचे विसर्जन कसे करायचे हा प्रश्न होता. त्यातून आम्ही मार्ग काढला. पहिल्या वेळी गणपतीसमोर भक्तांकडून जे नारळ अर्पण करण्यात आले होते, ते वाढविल्याानंतर त्यातील पाणी या चित्रावरून टाकण्यात आले आणि नंतर ते चित्र पुसण्यात आले. त्यामुळे गणपती विसर्जनासाठी त्यावेळी अवलंबलेली ही पद्धत आम्ही आजही पुढे सुरू ठेवली आहे. काही वर्षे साध्या खडूने चित्र काढण्यात येत होते. गेली काही वर्षे साध्या खडूने चित्र काढण्यात येत होते. गेली काही वर्षे आम्ही पोस्टर कलर वापरत आहोत. आमच्या चाळीतील श्री शैलेश वारंग हे सध्या गणपतीचे चित्र काढत असतात. सुमारे पाच फूट उंचीचे हे गणपतीचे चित्र असते.
- Kind
- Story
- Place
- Mumbai City
- Art
- Painting (Ālekhyam) · Kala 21
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #749 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash635606dc6e860c83ec8dcd319f6ea0d733d6e1bd6b04aa44da974160b052fe8e
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


