bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00736
२५ वर्षांचा राजा — एक अविस्मरणीय प्रवास
एक छोटीशी सुरुवात… आणि आज २५ वर्षांची भव्य परंपरा! 🚩 २५ वर्षांपूर्वी आपल्या गल्लीतील काही तरुणांनी एकत्र येत बाप्पाची स्थापना केली. त्या वेळी कदाचित कुणालाही कल्पना नव्हती की हा छोटासा उत्सव पुढे जाऊन संपूर्ण गल्लीच्या भावनेचा एक अविभाज्य भाग बनेल. वर्षे पुढे सरकत गेली… मंडळ बदलत गेले, चेहरे बदलत गेले, नवीन पिढ्या जोडल्या गेल्या; पण बाप्पावरील श्रद्धा आणि उत्साह मात्र कायम राहिला. ❤️ न्यू क्रांती मंडळचा राजा केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित राहिला नाही. या प्रवासात मंडळाने विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रमांमधून समाजाशी आपले नाते अधिक घट्ट केले. कधी विद्यार्थ्यांसाठी उपक्रम, कधी स्वच्छता अभियान, कधी वृक्षारोपण, कधी सामाजिक जनजागृती, तर कधी गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार… प्रत्येक उपक्रमामागे एकच भावना होती — बाप्पाची भक्ती करताना समाजासाठीही काहीतरी चांगलं घडवायचं! 🙏 या २५ वर्षांत असंख्य आठवणी तयार झाल्या. काही जण बालपणी बाप्पाच्या आरतीत उभे राहिले… आज तेच मोठे होऊन मंडळाची जबाबदारी सांभाळत आहेत. ही केवळ एका गणपती मंडळाची गोष्ट नाही… ही आहे एका गल्लीची, अनेक पिढ्यांची, असंख्य आठवणींची आणि बाप्पावरील अढळ श्रद्धेची कहाणी. ❤️🚩 २५ वर्षांचा प्रवास… अनेक उपक्रम… असंख्य आठवणी… आणि आपल्या सर्वांचा लाडका — 👑 न्यू क्रांती मंडळचा राजा! 👑 🙏 गणपती बाप्पा मोरया! 🚩
- Kind
- Story
- Place
- Akola
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #746 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash5df3eba45969952650513ab71b4f8c0e0d29ed8058eef7748823c18657fd8372
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


