bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00724
*बाप्पा नी आमच्या कडून घडवून घेतलेला आमचा या वर्षी चा घरचा गणपती !!*

आम्ही दरवर्षी गणपती शाडू मातीची गणपती मूर्ती सकारतो आणी त्याची 10 दिवस पूजा करतो. आणि हो विसर्जन घरीच करतो.. या वर्षी जरा तब्बेती मुळे बाप्पाची मूर्ती घडवता नाही आली, जी आम्ही साधारण १५ दिवस आधी बनवायला घेतो, जेणेकरून ती शाडू माती सुकायला आणी अधिक व्यवस्थित रंग देउन त्यावर बनवता कलाकृती करून सुंदर बनवता येईल. या वर्षी शेवटचा दिवस आला, मनात काही तरी चुकतंय असा वाटत होत. सहज काही सामान आणायला Reliance Mall वाकड येथे गेलो आत शिरल्याबरोबर तिथे काही गणेश मुर्त्या बघितल्या, मन एकदम खूप गहिवरून आलं. तेवढ्यातच एक लहान मुलगा शाडू मातीची नुकतीच घडवलेले मूर्ती घेऊन आला. त्याला मी विचारले कुठून आणली ही मूर्ती, तो बोलला इथे मॉल मध्ये मूर्ती बनवायची प्रयोग शाळा सुरु आहे. मग काय, माझे पाय न विचार करता तिकडे सरसावले, पण कार्यशाळा ते बंद झाली होती. तिथल्या व्यवस्थापकाला विनंती केली त्यांनी लगेच मला शाडू ची माती आणून दिली... क्षणाचाही विलंब ना करता मी मूर्ती बनवायला घेताना आणी आश्चर्य म्हणजे एक तासाच्या आत मूर्ती तयार ... सर्व घडत गेल आणी मूर्ती तुमच्या समोर आहे !! माझी मुर्ति बनवायची इच्छा पूर्ण होती होती, माझी मूर्ती एक तासात पूर्ण होती होती, सर्व जन आश्चर्य चकित होते आणी आम्ही पण !! जी मूर्ती आम्हाला दरवर्षी बनवायला दिवस जातो ती यावर्षी एवढ्या लवकर आणी सहजच सकार झाली, मन प्रसन्न आणी गहिवरून आल होतं. साकारलेली मूर्ती घरी घेऊन आलो, रात्री सर्व सजावट आणी पुजेची तयारी झाली. मनामध्ये एकच प्रश्न, मूर्ती वाळली नाही तर कस करायचं, डोळे काढता येणार काही. मुर्ति सजावट करता येणार नाही. .... पण बाप्पा सर्व घडवून आणतो याची प्रचिती झाली.. सर्व व्यवस्थित झाले, मूर्ती ला सकाळी साधी रंग रांगोटी बस्स सर्व तयारी झाली काही जणांची मदतही मिळाली आणी सर्व तयार !! Emotion तेच... Happy Devine loved त्यापेक्षाही जास्त *Blessed* आणी डोळ्यात पाणी... बरोबर दुपारी सर्व सज्ज आणी प्राण प्रतिष्ठा पण झाली आणी आमचा या वर्षीचा गणपति बाप्पानी बरोबर घडवून आणला..... गणपती बाप्पा मोरया !! मंगल मूर्ती मोरया !!
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- Painting (Ālekhyam) · Kala 21
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #734 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash5cd770b963915b412a898c7146234dbcf6c07a2393a33acf0bbf870215db4383
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


