bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00722
🌱 बाप्पाच्या विसर्जनानंतर...
सहा वर्षांपूर्वी घेतलेला एक छोटासा निर्णय… आज माझ्या अंगणात गोड फळं घेऊन उभा आहे. सन २०२०… गणेशोत्सवाचा काळ. श्री गणेशांच्या आगमनाचा आनंद तर होताच; पण बाप्पाला निरोप देताना मनात एक विचार आला—बाप्पाचं विसर्जन करायचं, पण त्याचबरोबर निसर्गालाही काहीतरी द्यायचं. म्हणून स्वतःच्या हातांनी पर्यावरणपूरक मातीची श्री गणेशमूर्ती साकारली. भक्तिभावाने बाप्पाची स्थापना केली आणि गणेशोत्सवाच्या शेवटी मूर्तीचं विसर्जन करताना नदी किंवा तलावाऐवजी निसर्गाच्या कुशीत एका छोट्याशा जांभळाच्या रोपाची सुरुवात केली. त्या दिवशी बाप्पाला निरोप दिला… पण त्याच दिवशी एका नव्या जीवनाचं स्वागतही केलं. दिवस गेले… महिने गेले… वर्षं सरत गेली. कधी ऊन, कधी पाऊस… कधी वाऱ्याची झळ, तर कधी पाण्याची कमतरता. तरीही ते छोटंसं रोप हळूहळू वाढत राहिलं. आणि आज… तेच रोप एका डौलदार जांभळाच्या वृक्षात रूपांतरित झालं आहे. यंदा त्या झाडाला पहिल्यांदाच जांभुळे लागली आहेत. झाडावर लगडलेली ती जांभळं पाहताना मनात एक वेगळीच भावना दाटून आली. बाप्पाला दिलेली श्रद्धेची निरोपाची भेट… आज निसर्गाने गोड फळांच्या रूपाने परत दिली होती. तेव्हा जाणवलं— निसर्गासाठी केलेली कोणतीही छोटीशी चांगली कृती कधीच वाया जात नाही. आपण एक बीज पेरतो… आणि निसर्ग त्याचं उत्तर एका दिवसात नाही, पण योग्य वेळी नक्की देतो. म्हणून यंदा बाप्पाच्या आगमनासोबत एक संकल्प करूया— पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना करूया… आणि बाप्पाच्या स्मरणार्थ एक झाड लावूया. कदाचित आज आपण लावलेलं ते छोटंसं रोप उद्या कुणाच्या अंगणात सावली देईल… पक्ष्यांना आसरा देईल… आणि एखाद्या दिवशी गोड फळंही देईल. कारण… बाप्पाला निरोप देताना जर निसर्गाला जीवन दिलं, तर तो निरोप नसतो… ती एका सुंदर भविष्याची सुरुवात असते. 🌱🙏 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! ❤️
- Kind
- Story
- Place
- Dhule
- Art
- Horticulture (Vṛkṣāyurveda-yoga) · Kala 53
- Contributed by
- ललित
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #732 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashdba7abdb0002516c988c2a73d0c5ab56217887856e3c41cc485b3fa36e32c87b
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


