bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00706
बाप्पा आले… निसर्गाच्या कुशीत आणि एक संदेश देऊन!
यंदाचा गणेशोत्सव काहीसा वेगळा असावा… असा विचार पंचशील माध्यमिक विद्यालय, न्याहलीने केला. बाप्पा यावेत… भक्तीचा आनंद घेऊन यावेत, पण जाताना आपल्या मनात निसर्ग जपण्याचा एक विचारही ठेवून जावेत. म्हणून शाळू मातीपासून बाप्पाची मूर्ती साकारण्यात आली. सजावटीसाठी पारंपरिक वस्तू वापरण्यात आल्या, तर काही टाकाऊ वस्तूंना नव्याने आकार देत सुंदर सजावट करण्यात आली. विद्यार्थ्यांनीही या संकल्पनेत मनापासून सहभाग घेतला… आणि गावाकडच्या मातीच्या सुगंधात, भक्तिभावाच्या वातावरणात बाप्पाचे आगमन झाले. पण बाप्पाच्या चरणांजवळ ठेवलेली एक छोटीशी कुंडी… सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. त्या कुंडीत रुजवण्यात आले होते एका झाडाचे छोटेसे बीज. 🌱 आज ते फक्त एक बीज आहे… पण उद्या ते एक मोठं झाड होणार आहे. बाप्पाचे विसर्जन होईल… पण बाप्पाच्या चरणांजवळ रुजलेले हे रोपटे मात्र वाढत राहील. बाप्पाला निरोप देताना, त्यांच्या आशीर्वादासोबत निसर्गाची ही जबाबदारीही आपण पुढे नेणार आहोत. कारण पंचशीलचा हा गणेशोत्सव सांगतो… “बाप्पा आले काही दिवसांसाठी, पण त्यांचा संदेश राहील… कायमचा!” 🌱🙏 गणपती बाप्पा मोरया!
- Kind
- Story
- Place
- Dhule
- Art
- Flower Displays (Puṣpa-śakaṭikā) · Kala 26
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #716 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash21383e1bf179260c62e254deb73a43984e61ae61e82418896786c9225e44b8d9
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


