bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00640
घोंगडे कुटुंबाचा यांचा जुना गणपती व गौरी
आमचा गणपती शाडू मातीचाच असतो आम्ही त्याचे विसर्जन घरीच टपात करतो. गणपती सह गौरी सुद्धा 200 वर्षा पासून आमच्या कुटुंबात बसवल्या जातात गौरीचे मुखवटे खूप पुरातन आहेत 200 वर्षा पूर्वीचे ते आम्ही जपून ठेवतो दर वर्षी तेच मुखवटे लक्ष्मी चे /गौरीचे बसवतो. त्यांना उभ्या करतो अडणी वर मग सजावतो खूप. डेकोरेशन करतो. पहिल्या दिवशी आगमन - त्यात गौरी गणपतीला भाकरी व अंबाड्याची भाजीचा नैवेद्य असतो दुसऱ्या दिवशी - सकाळी केसरी भात, दुपारी -पुरणपोळी, खीर, आमटी, भात, 16 भाज्या, 9,9 असे 18 दिवे कानिकाचे, 9,9 मुटकुळे 9,9 असे 18, दिवाळीतीलसर्व फराळ - लाडू, चकली, संजोरी, अनारसे, सांजोरी, करंजी, चिवडा, शेव, चकली, सर्व सुका मेवा जसे काजू, बदाम, मनुके, अंजीर, सुपारी, खारीक, खोबरे, वेलदोडे, लवंग, पिस्ते, 16 भाज्या, 5 फळे सर्व नैवेद्य असतो 3) तिसऱ्या दिवशी सकाळी शेवाळ्या, गूळ गव्हाच्या पिठाचे कान्हूले नैवेद्य असतो दुपारी /संध्याकाळी वेढे 5 स्त्रिया बोलावून दोरे म्हणतात 9,11,7 पदरी दोरे पिवळे हळदीने केलेले त्यात प्रत्येक स्त्रीने वस्तू ओवायच्या खोबरे तुकडे, खारीक तुकडे, वेलदोडा, बदाम तुकडा, तुळशीचे पान, विड्याचे पान, रेशम सूत, सुपारी तुकडा मग घरातील स्त्री ओटीत ह्या दोरे 5 स्त्री कडून घेते देवीच्या डोक्यावर ठेवते गौरी गणपती उठवले जातात गौरी सोबत एक अनारसे, सांजोरी ठेवली जाते ती वर्षाने पुढच्या वर्षी काढली जाते आश्चर्य म्हणजे ते जशेचे तसें राहते.मुखवाटे पेटीत ठेवले जातात गणपती चे विसर्जन टपाट केले जाते
- Kind
- Tradition
- Place
- Dhule
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #650 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash829501ed637575c7c4da8fe75a270489836648079dc281c511d8c8b390981070
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


