bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00636
आमच्या घराचं अस्तित्व बाप्पा मोरया

तुझ्या आगमनाची आम्ही वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो. जेव्हा तू आमच्या घरी आणि मनात येतोस, तेव्हा सगळी दुःख, चिंता आणि नैराश्य कुठल्या कुठे पळून जाते. तुझ्या त्या हसऱ्या आणि शांत मूर्तीकडे पाहिले की, मनातील सर्व वादळे शांत होतात आणि एक अनामिक शक्ती मिळते.तू 'सुखकर्ता' आणि 'दुःखहर्ता' आहेस. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाशी दोन हात करण्याची ताकद तूच आम्हाला देतोस. तू बुद्धीची देवता आहेस, आम्हाला नेहमी सत्बुद्धी दे, जेणेकरून आमच्याकडून कोणाचेही मन दुखावले जाणार नाही. समाजातील भेदभाव, द्वेष संपून सगळीकडे प्रेम आणि सौहार्द नांदू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना.बाप्पा, तुझ्या उपस्थितीतले ते काही दिवस कसे भुर्रकन निघून जातात, समजतच नाही. आणि शेवटी येतो तो तुझा निरोपाचा दिवस... 'पुढच्या वर्षी लवकर या' म्हणताना आमचे डोळे भरून येतात आणि घर रिकामे रिकामे वाटू लागते. पण आम्हास माहीत आहे की, तू मूर्ती रूपाने जात असलास तरी आशीर्वाद रूपाने नेहमी आमच्या पाठीशी असतोस.तुझ्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की, जगातील प्रत्येक माणसाला सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभू दे. प्रत्येकाच्या अडचणी दूर कर आणि सर्वांना सुखी ठेव.|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ||
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Amol Ramchandra khude
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #646 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashb6e0dd32899b34532c8d5b4a0fd558339a429b7fedaae3dd88571a00ecb44cf7
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


