bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00612
बाप्पा

कुठून सुरू करू.... हा विचार करताना बालवयातील आठवणी आणि जाणिवा त्या पाऊल खुणा आजही जिवंत होतात. त्या वेळेस हा उत्सव केवळ उत्सव नव्हता तो आमच्या सामाजिक सांस्कृतिक व सोबत आर्थिक साक्षरतेचे एक विद्यापीठ होता. गणपती टिळकांनी सुरू केलेला हा उत्सव सामाजिक बांधिलकी साठी मोठा दुवा ठरला. मला आजही आठवते नव्वदच्या दशकातील ती गोष्ट एक छोटी आठ बाय दहा ची टीनाची खोली होती . तिथे एक मजूर परिवार राहायचा आम्ही आमचा पहिला सार्वजनिक गणपती त्याच रूम मध्ये बसविला होता. आता हे लक्षात येत की तो परिवार हिंदू नव्हता तरी दहा दिवसाची आरास आरत्या आम्ही बालवयात तिथे केल्या. तेव्हा त्यांच्या मुलाच्या मनात ही जात पात धर्म याचा लवलेशही नव्हता. हा उत्सव आमच्यासाठी माणुसकीचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरला. सुमारे महिनाभरातील पासून या उत्सवाची नियोजन करायला लागायचे. त्याची एक बजेट ठरवून आम्ही सर्व खर्च लिहून काढायचो आणि त्यानुसार वर्गणी कशी करायची हे ठरवायचो . पावती पुस्तक छापून घरोघरी सुमारे एक महिना अगोदरपासून वर्गणी गोळा व्हायची. ठरलेल्या बजेटनुसार वर्गणी जर झाली नाही तर तर नंतरची व्यवस्था कशी करायची याच्या आर्थिक नियोजन आम्ही करायचो. बजेट पेक्षा कमी पैसा असला तूट भरपाई करण्यासाठी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करायचो त्यामध्ये नाट्य स्पर्धा, नृत्य स्पर्धा, निबंध स्पर्धा इत्यादी सशुल्क स्पर्धक घेऊन पार पाडायचो त्यामुळे आमची आर्थिक तूट भरून निघायची. या माध्यमातून आर्थिक साक्षरता आणि पर्यायाने सांस्कृतिक सहभाग वाढत गेला पुढे हा सहभाग एक प्रगल्भ माणूस म्हणून तयार होण्यास आम्हास मोलाचा राहिला. या पूर्ण प्रवासामध्ये आम्हाला गणपती ऊर्जेचे स्त्रोत होता. कारण दरवर्षी हा गणपती आम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात दिसला तो कधी योद्धा होता तर कोणत्या वर्षी आशीर्वादाचे हात वर करून उभा होता, तू कधी सहिष्णू होता , कधी विद्येचा दाता होता, तो कधी विज्ञानवादी आणि पुरोगामी दिसला, तर कधी स्वतः भक्तीत लीन झालेला दिसला, तो कधी बाल रूपामध्ये तर कधी वारकऱ्यांच्या वेशात दिसला. माझ्यासाठी गणपती उत्सव म्हणजे जिथे सर्व वर्ण एकत्र येतात आणि लोप पावतात असा सर्व समावेशक दीपस्तंभ आणि दिशादर्शक आहे. पण आज घरोघरी आपण गणेशोत्सव साजरा करतो. पण सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कक्षा अरुंद होत आहे.
- Kind
- Story
- Place
- Akola
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- धनंजय देशमुख
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #622 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash278d33633d6553b3a72a188c879dfce06e0701a2bcff361bcdb47221c3f715fb
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


