bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00602
माझे बाप्पा

दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या घरात गणपतीच्या आगमनाची धावपळ सुरू होती. पण घरातील वातावरण नेहमीसारखं उत्साही नव्हतं. अचानक झालेला अपघात आणि सर्व धस्तावलेले प्रत्येकाच्या मनात कुठेतरी एक अनामिक काळजी आणि ताण होता. "यंदा आपण बाप्पाची मूर्ती लहान आणूया आणि सजावट अगदी साधी करूया," मुलांनी सायंकाळी जेवण करतांनी हळूच सुचवलं. गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी शिवराज, श्रीराज आणि कृष्णराज बाप्पाची मूर्ती घेऊन घरी आले . मूर्ती लहान होती, पण तिचे डोळे एवढे बोलके होते की घरात पाऊल ठेवताच एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा पसरली. गृहलक्ष्मीने तुळशीच्या पानांनी आणि साध्या फुलांनी बाप्पाचा मखर सजवला होता. आरतीची वेळ झाली. मी टाळ घेतला, शिवराज ने झांज वाजवली आणि श्रीराज ने आरती गाण्यास सुरुवात केली. त्या दहा मिनिटांच्या आरतीत घरातील वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. गेल्या काही महिन्यांपासून विसरलेलं हसू प्रत्येकाच्या चेहऱ्यावर परत आलं होतं. पुढच्या दिवशी काही मोठी जादू झाली अपघातातील वाहणाचा खर्च अर्ध्यवर आला आणि वाहन सुद्धा नविन सारखे झाले आणि अचानक पैस्याची व्यवस्था सुद्धा झाली. घरातला संवाद वाढला. संध्याकाळी सगळे एकत्र बसून गप्पा मारू लागले, ताईच्या तब्येतीत सुधारणा झाली, आणि शिवराज आणि श्रीराज ने नव्या उमेदीने पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. बाप्पाने परिस्थिती बदलली नव्हती, पण ती परिस्थिती हसतमुखाने हाताळण्याचं 'धैर्य' आणि 'बुद्धी' संपूर्ण कुटुंबाला दिली होती. अनंत चतुर्दशीच्या दिवशी जेव्हा बाप्पाला निरोप देण्याची वेळ येईल , तेव्हा निश्चित कृष्णराज च्या डोळ्यात पाणी असेल. आम्ही सर्व बाप्पाच्या पाया पडलो आणि मनोमन म्हणालो "बाप्पा, तू आलास आणि आमच्यातली निराशा काढून चैतन्य निर्माण केलेस आणि विश्वास निर्माण केला " गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!!!
- Kind
- Story
- Place
- Malegaon
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Nitin shivaji mande
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #612 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash60bdae65fce35609be6a42117c35a712fca928269871d4bcc029d2c55360cef0
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


