bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00557
टर्कल
कृती - 1) गव्हाचे पीठ त्यात थोडेसे मीठ पाणी थोडे थोडे घालून कणिक मळतो त्या पेक्षा घट्ट मळा. 2) हाताला थोडे तूप लावून पीठचा गोळा घ्या. हातावर लांबट करा.पोळपाटवर शेवाळी सारखे बारीक सर करा. त्या सरचे 2/3 इंच तुकडे, तुकडे करून मोठ्या ताटात तुकडे टाका त्या वर थोडे कोरडे गव्हाचे पीठ टाका म्हणजे चिटकत नाही. ते तुकडे पिठात घोलून घ्या. थोडेसे पीठ हवे नाहीतर पीठ चिटकेल आणि पीठ पीठ होईल. 2)एका पातेल्यात 4/5 वाटी पाणी घेऊन गॅसवर पाणी उकळायला ठेवा. उकळाले कि त्यात ह्या तुकडे तुकडे बारीक शेवई सारखे त्यात पातेल्याय ओता. मोठ्या चमच्याने हलवा. थोडे उकळीत शिजले *टर्कल* मग 3)हे किसलेले वस्तू खोबरे, गूळ, खारीक चूर, वेलदोडा व जायफळ पूड 2 चिमूटभर, खसखस त्यात उकडत असलेल्या पातेल्यात टाका. हलवा. थोडा वेळ राहू द्या 5/10 मिनिटे अंदाज घेऊन 4) गॅस बंद करून गरम गरम टर्कल चमच्याने वाटीत काढून घ्या. त्या वर आवडीनुसार साजूक तूप, गरम दूध टाकून बाप्पाला नैवेद्य दाखवा मग सर्व / खा खूप छान लागतात अप्रतिम. आमच्या कडे 150 years पासून *टर्कल* प्रसाद बाप्पाना दिला जातो. संगीता घोंगडे सहाय्यक महसूल अधिकारी उपविभागीय अधिकारी कार्यालय अमळनेर जिल्हा जळगाव
- Kind
- Recipe
- Place
- Jalgaon
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #567 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash7332e10149a51f79f4b3580f6aa4a11511e25b246bdcea8d323cb9c58cecae07
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


