bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00555
एक गाव एक गणपती
12 वर्षापूर्वी माझ्या छोट्याशा गावामध्ये एकूण प्रत्येक घरात एकूण 13 गणपती बसवले जात होते. गावातील सर्व तरुण मंडळी व ज्येष्ठ लोकांना व महिला वर्गाची 1 बैठक घेऊन मी आपल्या सर्वांचा मिळून एकच गणपती गावच्या मंदिरामध्ये स्थापन करू आणि सर्वांनी मिळून पूजा करूया. ज्यामुळे आपली एकी वाढेल आणि खर्च ही कमी होईल या संकल्पनेला सर्वांनी मान्यता दिली आणि आज 12 वर्षाचे 1 तप पूर्ण झाले आहे. आमच्या गणपतीची मिरवणूक कोणतेही वाद्य अथवा गुलाल विरहित पार पडते. सर्व भाविक टाळ टाळी आणि गणपतीच्या नाम गजरात आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येते.खऱ्या अर्थाने एक गाव एक गणपती असा उपक्रम राबविण्यात येत आहे.
- Kind
- Story
- Place
- Satara
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- संतोष शामराव पवार
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #565 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash3012cd586a5de11573864df34632dcb1e4c1846030a673e0b820f416fd6d0d2d
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


