bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00525
चाळीतून टॉवरपर्यंत.. संस्कृतीचा वारसा अखंड.

नाव - जागृत जगदीश काळे पत्ता - परळ संकल्पना- चाळीतून टॉवरपर्यंत.. संस्कृतीचा वारसा अखंड. परळमधील जागृत जगदीश काळे यांनी आपल्या घरगुती गणपतीत साकारलेला ‘चाळीतून टॉवरपर्यंत’ हा देखावा. ही सजावट केवळ दहीहंडीचे दृश्य नाही, तर आपल्या बदलत्या मुंबईच्या संस्कृतीची एक भावनिक कथा आहे. चाळींचे पुनर्विकास होऊन टॉवर उभे राहिले आणि जीवनशैली आधुनिक झाली. मात्र, आधुनिकतेच्या या प्रवासात आपली संस्कृती आणि सणांची परंपरा हरवू नये, हा या सजावटीचा मुख्य संदेश आहे. यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाच्या दरबारात उलगडतोय मुंबईचा बदलता चेहरा आणि अखंड संस्कृतीचा वारसा! 🙏✨ विशेष म्हणजे यात विराजमान झालेली बाप्पाची मूर्ती ही पूर्णपणे इको-फ्रेंडली (Eco-friendly) असून ती ‘पंचधातू’पासून बनलेली आहे. आपल्या सणांमधूनच आपल्या देशाची सांस्कृतिक ओळख जिवंत राहते.
- Kind
- Story
- Place
- Mumbai City
- Art
- Architecture (Vāstu-vidyā) · Kala 29
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #535 in a hash chain of 2,052. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash552a2d3ea63a089219b77777cc1b73a2391eee8e9ee30cbd6cecc9fe8621ee77
Chain head6cfde45facf2c7d15766904589c11b07e9a88db585a4b39a48fb988e8813e408
The chain verifies end to end as of this page load.


