bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00523
उकडीचे माेदक
सारण बनवण्याची पद्धत: 1. एका कढईत मध्यम आचेवर १ चमचा तूप गरम करा. त्यात खसखस टाकून हलकी भाजून घ्या. 2. आता त्यात काजू-बदामाचे तुकडे आणि खोवलेला ओला नारळ घालून २-३ मिनिटे परतून घ्या. 3. त्यानंतर त्यात गूळ घाला व मिश्रण एकत्र करा. गूळ वितळल्यावर सारण ४-५ मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या. 4. टिप: सारण जास्त सुके किंवा जास्त चिकट करू नका, ते रसरशीत ठेवावे. 5. शेवटी गॅस बंद करून वेलची आणि जायफळ पूड मिक्स करा. सारण पूर्णपणे थंड होऊ द्या. पिठाची उकड काढणे: 1. एका पातेल्यात १/२ कप पाणी, १/२ कप दूध, १ चमचा तूप आणि चिमूटभर मीठ एकत्र करून उकळायला ठेवा. 2. पाण्याला छान उकळी आली की गॅस मंद करा आणि तांदळाचे पीठ हळूहळू घालत मिक्स करा. 3. पीठ व्यवस्थित ढवळून झाल्यावर गॅस बंद करा. पातेल्यावर झाकण ठेवून ५ मिनिटे वाफ येऊ द्या. 4. उकड गरम असतानाच एका परातीत काढून घ्या. हाताला थोडे पाणी किंवा तूप लावून पीठ छान मऊसर मळून घ्या. पिठात गुठळ्या राहणार नाहीत आणि त्याला तडे जाणार नाहीत याची काळजी घ्या. मोदक वळणे आणि कळ्या पाडणे: 1. मळलेल्या पिठाचा एक छोटा लिंबाएवढा गोळा घ्या गोळ्याला अंगठ्याच्या आणि बोटांच्या मदतीने गोल फिरवत वाटीसारखा (पारी) पातळ आकार द्या. 2. या पारीच्या कडांना अंगठा आणि शेजारील दोन बोटांच्या मदतीने जवळ जवळ चिमटून कळ्या पाडून घ्या. 3. आता वाटीच्या मध्यभागी १ ते १.५ चमचा तयार केलेले सारण भरा. 4. सर्व कळ्या एकत्र करत वरच्या बाजूने गोल फिरवत मोदकाचे टोक बंद करा. मोदक वाफवणे: 1. स्टीमर किंवा मोदकपात्रात पाणी गरम करायला ठेवा. वाफवण्याच्या चाळणीला तूप लावा किंवा त्यावर ओला सुती कपडा/केळीचे पान ठेवा. 2. मोदकाचा तळ हलका पाण्यात बुडवून ते चाळणीत ठेवा (यामुळे मोदक खाली चिकटत नाहीत). 3. मध्यम आचेवर मोदक १० ते १२ मिनिटे छान वाफवून घ्या.
- Kind
- Recipe
- Place
- Akola
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #533 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash5f44366f780c2f8a96c5cd6ce718193af36bb31924f3230088f7c0651dfd180c
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


