bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00487
आठवणीतील हरतालिका म्हणजे केवळ पूजा किंवा उपवास नाही; ती आजीने शिकवलेली परंपरा, मातीशी जोडलेलं बालपण आणि पिढ्यान्पिढ्या
९–१० वर्षांचा होतो… एक दिवस आजीने हातात पैसे दिले आणि म्हणाली— “खाली गणपतीवाल्याकडे जा… माती घेऊन ये. दोन हातात हात घालून फुगडी घालतात ना, तशा दोन बाहुल्या बनव… आणि समोर शंकराची पिंड कर… झाली हरतालिका!” तेव्हा आजीचं बोलणं ऐकलं… पण त्या मातीमध्ये लपलेला संस्कार कळला नव्हता. आज आजीला जाऊन १५–२० वर्षं झाली… पण तिने माझ्या हातात दिलेली ती परंपरा आजही माझ्या हातून पुढे चालू आहे. आजही माती आणतो… आजही दोन बाहुल्या करतो… आजही शंकराची पिंड बनवतो… आणि आजीने शिकवलेल्या पद्धतीने हरतालिका पुजतो. आणि एक गोष्ट आजही मनाला स्पर्श करून जाते… माझी पूजा झाल्याशिवाय गावातील बायका हरतालिकेचा उपवास सोडत नाहीत. तेव्हा वाटतं… आजी गेली नाहीये… ती या परंपरेत आहे, या मातीत आहे, या पूजेत आहे… आणि माझ्या हातून होणाऱ्या प्रत्येक हरतालिकेत ती पुन्हा एकदा माझ्यासमोर उभी राहते. हरतालिका म्हणजे फक्त पूजा नाही… हरतालिका म्हणजे आजीची आठवण. हरतालिका म्हणजे एका पिढीने दुसऱ्या पिढीला दिलेला संस्कार. माणसं जातात… पण त्यांनी शिकवलेली परंपरा जोपर्यंत आपण जिवंत ठेवतो, तोपर्यंत ती माणसं कधीच आपल्यापासून दूर जात नाहीत. आजी… तू नाहीस, पण तुझी शिकवलेली हरतालिका आजही आहे. आणि म्हणूनच… माझ्यासाठी हरतालिका म्हणजे— “आजीच्या हाताने दिलेला संस्कार… आणि आयुष्यभर जपायची तिची आठवण.” ❤️🙏
- Kind
- Story
- Place
- Sindhudurg
- Art
- Children's Toys (Bālaka-krīḍanaka) · Kala 33
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #497 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash7b92d0489f839e9b1688339abcf0acd8924c78d78a0b2b5b300376c864e62769
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


