bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00406
आमचा गणपती बाप्पा

आमचे ता.जि. जालना येथील डोणगावकर (कुलकर्णी ) कुटंबातील गणेशोत्सवास पुरातन परंपरा आहे. उजव्या सोंडेचा गणपती बाप्पा हा आमच्या देवघरातील आद्य दैवत असल्यामुळे दररोज पुजा अर्चना असते. तसेच दर संकष्टी चतुर्थीला कुटूंबातील सर्वजण चतुर्थीचा उपवास करतात तसेच चंद्रोदयानंतर नैवेद्य आरती करुन उपवास सोडला जातो. माझे सासरे कै. विष्णूपंत डोणगावकर यांनी २१ वर्षांपेक्षा जास्त वर्षे दर चतुर्थीला श्री क्षेत्र राजूर महागणपतीच्या वा-या केलेल्या आहेत. माझे पती यांचा जन्म देखील अंगारकी चतुर्थीचाच आहे. त्यामुळे घरातील सर्व मंडळी ही लाडक्या बाप्पाची आराधना करतात. श्री गणपती अथर्वशिर्ष, श्री गणेश स्त्रोत्र, श्लोक पठण घरातील सर्व मंडळी नित्य नेमाने करतात. भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव तर सर्वांसाठी उत्साहाची पर्वणीच असते. श्री गणपती प्रतिष्ठापना, दररोज पुजा, मोदकांचा नैवेद्य, सकाळी – संध्याकाळी आरती हे नित्यनेम असतात. श्री गणपती प्रतिष्ठापना झाल्यावर २१ अनारश्यांनी गणपतीचा नवसाचा पार भरला जातो. दहा दिवस घरात तसेच गल्लीमध्ये, संपूर्ण जालना शहरामध्ये, जिल्हयामध्ये- राज्यामध्ये उत्साहाचे वातावरण असते. अनंत चतुर्दशीला साश्रुनयनांनी श्री गणपती बाप्पांचे विसर्जन करुन त्यांना निरोप दिला जातो आणि गणपती बप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष होतो.... आणि पुन्हा प्रतिक्षा... पुढच्या वर्षीच्या गणेशोत्वाची... गणपती बाप्पा मोरया... ओम गं गणपतये नमः.. बाप्पा तुझी कृपा आमच्या सर्वांवर अशीच वर्षत राहू दे... आणि तुझा हा उत्सव राज्योत्सव, देशोत्सव... विश्वोत्सव होवूदे हीच मंगल कामना.
- Kind
- Story
- Place
- Jalgaon
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #416 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hasha7287457a7ce09b3a2d26fea6f06d050de35e407d3c400606abe114b82f8b5b2
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


