bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00403
निरागसतेपासून स्वावलंबनाकडे नेणारा एक सुंदर प्रवास.....

पीनूच्या हातांनी घडला बाप्पा… निरागसतेपासून स्वावलंबनाकडे नेणारा एक सुंदर प्रवास…. वर्णिका शर्मा (पीनू) निरागस, निस्वार्थी, कोमल आणि अगदी गोड मुलगी. निसर्गाने तिच्यावर अन्याय केला, परिस्थितीने तिची परीक्षा घेतली आणि आयुष्याच्या सुरुवातीपासूनच तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आई विविध आजारांमुळे अंथरुणाला खिळलेली, वडिलांची साथ नसलेली आणि अवघा तेरा-चौदा वर्षांचा लहान भाऊ छोटे-मोठे काम करून आई-बहीणीचा उदरनिर्वाह करत होता. अशा परिस्थितीत पीनूचे भविष्य अंधारात हरवले होते. नाशिक येथील एका मैत्रिणीने तिची परिस्थिती पाहिली आणि स्वयंदीप परिवाराशी संपर्क साधला.अशा परिस्थितीत पीनू स्वयंदीपमध्ये आली. सुरुवातीला पीनूला अनेक गोष्टी आठवत नव्हत्या. तिच्या दैनंदिन हालचालीही मंदावल्या होत्या. मात्र स्वयंदीप परिवाराने ठरवले. ही पीनू पुन्हा उभी राहिली पाहिजे!” तिच्यासोबत सातत्याने काम सुरू झाले. रोज योगाभ्यास, शब्दांची ओळख, संवाद, स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय आणि छोट्या-छोट्या जबाबदाऱ्या… अशा अनेक प्रयत्नांतून पीनू हळूहळू आत्मविश्वासाने पुढे येऊ लागली. आज पीनू स्वतःची कामे स्वतः करते, चावरा स्पेशल स्कूल, चाळीसगाव येथे शिक्षण घेते, रोज शाळेत जाते, अभ्यास करते आणि आनंदाने नृत्यही करते. आणि आता तिच्या या प्रवासात आणखी एक सुंदर पाऊल जोडले गेले आहे. पीनूने स्वतःच्या हातांनी मातीचा गणपती बाप्पा घडवला!अत्यंत साध्या मातीपासून तिने प्रेमाने, संयमाने आणि कौशल्याने सुंदर व सुबक गणपतीची मूर्ती तयार केली. हा केवळ मातीचा गणपती नाही…तो पीनूच्या वाढत्या आत्मविश्वासाचा, तिच्या कौशल्याचा आणि स्वावलंबनाकडे झालेल्या प्रवासाचा सुंदर प्रतीक आहे.ज्या मुलीसमोर कधीकाळी भविष्याचा अंधार होता, तीच आज स्वतःच्या हातांनी विघ्नहर्ता बाप्पाला आकार देत आहे.पीनूच्या चेहऱ्यावरचे हसू आणि तिच्या हातांनी घडलेला बाप्पा पाहताना स्वयंदीप परिवाराला एकच भावना वाटते. छोट्या-छोट्या पावलांनी घडते मोठी उंच भरारी! पीनूच्या या प्रवासातून एक गोष्ट नक्की शिकायला मिळते….दया नको… संधी द्या. सहानुभूतीपुरती साथ नको… स्वावलंबनाची दिशा द्या. कारण योग्य संधी आणि प्रेमाची साथ मिळाली, तर प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्वतःचे आयुष्य घडवण्याची ताकद असते. मीनाक्षी निकम….संस्थापक अध्यक्षा, स्वयंदीप परिवार, चाळीसगाव 9604927852“
- Kind
- Story
- Place
- Jalgaon
- Art
- Painting (Ālekhyam) · Kala 21
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #413 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash2d44dcf12abf2483c6779ace3a5ad1c0270883e31aacca0520f4d745bc36d638
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


