bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00329
आमच्या गावचा गणपती

आमच्या भातोडी गावात गणपती म्हणजे फक्त उत्सव नाही, तर एकतेचं प्रतीक आहे. दहा दिवस संपूर्ण गाव एकत्र येतं. शेतकरी, विद्यार्थी, आजी-आजोबा सगळे बाप्पाच्या मंडपात सेवा करतात. आमचा बाप्पा साधा आहे, पण त्याच्यावर श्रद्धा मोठी आहे. कोणी नवस बोलतो, कोणी फक्त दर्शनाला येतो. आरतीच्या वेळी ढोल-ताशांच्या गजरात गाव दुमदुमून जातं. बाप्पा येतो तेव्हा पाऊस पण चांगला पडतो, अशी आमची श्रद्धा आहे. विसर्जनाच्या दिवशी डोळे पाणावतात, पण बाप्पा शिकवून जातो - एकत्र राहिलो तर कोणतंही संकट मोठं नाही. गणपती बाप्पा मोरया..
- Kind
- Story
- Place
- Jalna
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Sandeep Kumar
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #337 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashb82841e7b5a83e985aa6920cfca402450649caf749679eb88d55630c60e9c6a2
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


