bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00300
आमच्या गल्लीतल्या पहिला गणपती

मातीच्या गणपतीमागची कथा आणि उद्देश आपल्या गल्लीत पहिल्यांदाच मातीचा गणपती उचलण्यामागे केवळ गणेशोत्सव साजरा करण्याचा हेतू नाही, तर आपल्या मातीशी, संस्कृतीशी आणि पारंपरिक रीती-रिवाजांशी पुन्हा एकदा जोडले जाण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. आजच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनात अनेक पारंपरिक प्रथा, सण-उत्सव आणि सांस्कृतिक उपक्रम हळूहळू मागे पडत आहेत. कामाची व्यस्तता, शहरातील बदलती जीवनशैली आणि वेळेचा अभाव यामुळे आपल्याच संस्कृतीतील अनेक गोष्टी आपण विसरत चाललो आहोत. म्हणूनच आपल्या गल्लीत अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून, त्यांचे विषय काय असावेत, कोणते पारंपरिक उपक्रम घ्यावेत आणि त्यांची निवड कधी व कशी करावी, यावर सर्वांनी एकत्र येऊन चर्चा करावी, हा यामागचा उद्देश आहे. या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या व्यस्त जीवनातून थोडासा वेळ काढून आपल्या पारंपरिक रीती-रिवाजांना पुन्हा आपल्या दैनंदिन जीवनात स्थान द्यावे. पुढच्या पिढीलाही आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी आणि आपली माती, आपली संस्कृती आणि आपली परंपरा जपण्याची भावना निर्माण व्हावी, हीच या उपक्रमामागची खरी भावना आहे. गणपती बाप्पा मोरया! आपली संस्कृती – आपली परंपरा – आपली जबाबदारी!
- Kind
- Story
- Place
- Jaipur
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #308 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash1e6b8eadbd4022e72f4bd77bb01031724695bee4c7599f1cc017846ff4efc12e
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


