bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00292
पवार बंधूंचा ऐतिहासिक १३९ वा गणेशोत्सव – २०२६
वार बंधूंचा ऐतिहासिक १३९ वा गणेशोत्सव – २०२६ 🙏🌺 १८८७ मध्ये आमचे खापर पणजोबा श्री. गणपत पवार यांनी आमच्या घरी श्रीगणेशाची स्थापना केली… त्या दिवसापासून सुरू झालेली ही भक्ती, संस्कार, कला आणि परंपरेची ज्योत आज तब्बल १३९ वर्षे अखंड तेवत आहे. बाप्पाची १८ इंचांची बालमूर्ती आजही अगदी पूर्वीप्रमाणेच आहे. मूर्तीचे स्वरूप बदलले नाही… बदलत गेले ते फक्त सजावटीचे रूप! आमचे वडील श्री. राम लक्ष्मण गणपत पवार यांच्या काळातील साध्या बांबू-लाकडाच्या सजावटीपासून सुरू झालेला हा प्रवास, आमचे ज्येष्ठ बंधू श्री. विजय राम पवार यांच्या चलतचित्रांपासून मंदिरांच्या प्रतिकृतींपर्यंत आणि आजच्या आधुनिक कलात्मक सजावटीपर्यंत पोहोचला आहे. आणि यंदाची संकल्पना आहे— 🥁🚩 “गंधर्व मूषकराज ढोलपथक” 🚩🥁 तालाच्या ठेक्यावर नाचणारे मूषकराज, हातात भगवे ध्वज आणि उत्साहाने दुमदुमणारे ढोल-ताशांचे स्वर… ही संकल्पना आमच्या सहाव्या पिढीतील चिरंजीवांकडून सुचली असून, त्यांच्या “स्वरगंधर्व” ढोलपथकाच्या प्रेरणेतून साकारली आहे. एक पिढी परंपरा देते… दुसरी ती जपते… आणि पुढची पिढी तिला नव्या रूपात पुढे घेऊन जाते! हीच आमच्या पवार कुटुंबाची १३९ वर्षांची परंपरा आहे. ❤️ 🙏 श्रीगणरायाच्या कृपेने ही परंपरा अशीच पिढ्यान्पिढ्या अखंड सुरू राहो, हीच प्रार्थना! आपले प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छा सदैव आमच्या सोबत आहेतच. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🌺🙏 आपले स्नेहांकित, पवार बंधू आणि पवार कुटुंबीय
- Kind
- Tradition
- Place
- Thane
- Art
- Architecture (Vāstu-vidyā) · Kala 29
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 16 September 2026
Evidence
This entry is record #300 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash7a2d76a3230ea03e2be81be2c372f9f821ea7d0912b46158e70fab4227a58728
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


