bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00288
चव्हाण कुटुंबाचा बाप्पा – २३ वर्षांची कौटुंबिक परंपरा

चव्हाण कुटुंबात गेल्या २३ वर्षांपासून गणपती बाप्पाची ही कौटुंबिक परंपरा श्रद्धेने आणि उत्साहाने जपली जात आहे. आमच्या कुटुंबातील अनेक सदस्य कामानिमित्त मुंबईत राहतात, तर काहीजण देवली गावात राहतात. मात्र बाप्पाच्या आगमनाचे सात दिवस आम्हा सर्वांना पुन्हा एकत्र आणतात. मुंबई आणि गावात राहणारे संपूर्ण चव्हाण कुटुंब बाप्पासाठी देवली गावात एकत्र येते. या सात दिवसांत आम्ही बाप्पाची मनोभावे सेवा करतो. पूजा, आरती, भजन, एकत्र जेवण, गप्पा, फुगडी आणि कुटुंबासोबतचा आनंद हे आमच्या गणेशोत्सवाचे खास वैशिष्ट्य आहे. पेटी आणि तबल्याच्या साथीने संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन भक्तिभावाने आरती करते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण या उत्सवात सहभागी होतो. यावर्षी आमची संकल्पना “वडाच्या छायेत बाप्पा” अशी आहे. पाठीमागे वडाचे झाड आणि त्याच्या छायेत विराजमान बाप्पा (स्वामींच्या रूपात), भक्तांना आशीर्वाद देत असल्याची भावना या संकल्पनेतून मांडली आहे. या सजावटीतून निसर्ग, श्रद्धा आणि भक्ती यांचा सुंदर संगम साकारण्याचा आमचा प्रयत्न आहे. शहराच्या धावपळीपासून दूर, कोकणातील आपल्या गावात बाप्पाच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंबाने सात दिवस एकत्र येणे हीच आमच्या गणेशोत्सवाची खरी ओळख आहे. गेल्या २३ वर्षांपासून बाप्पा आमच्या कुटुंबाला एकत्र आणत आहे. हीच भक्ती, आपुलकी आणि कौटुंबिक परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत जपली जावी, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
- Kind
- Story
- Place
- Maharashtra
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 15 September 2026
- Accepted
- 15 September 2026
Evidence
This entry is record #296 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashcf6fb63bff14264667e2aff32005c9dcd9cca14d61933066b4717f890eb2a5e9
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


