bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00283
20 वर्षाची परम्परा

अवघ्या ₹300/- पासून सुरू झालेला प्रवास… आज समाजसेवेची प्रेरणादायी ओळख राधाकृष्ण गणेश उत्सव मंडळाची सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रभक्तीची सेवाभावी वाटचाल गणेशोत्सव म्हणजे केवळ पूजा, सजावट आणि मनोरंजन नव्हे… तर समाजासाठी काहीतरी करण्याची संधी! या विचारातून सन 2006 मध्ये अवघ्या ₹300/- पासून सुरू झालेला राधाकृष्ण गणेश उत्सव मंडळाचा प्रवास आज असंख्य समाजोपयोगी उपक्रमांमुळे एक प्रेरणादायी चळवळ बनला आहे. 🔹 अंधश्रद्धा निर्मूलन व समाजप्रबोधन 🔹 व्यसनमुक्ती अभियान व सत्यपाल महाराजांचे प्रबोधन कार्यक्रम 🔹 भजन स्पर्धा व विविध सांस्कृतिक उपक्रम 🔹 गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 🔹 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम 🔹 वृक्षारोपण, रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरे 🔹 ग्रामस्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग 753 राष्ट्रीय महामार्ग वर रस्ता दुरुस्ती 🔹 नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सामाजिक पुढाकार 🔹 ज्येष्ठ नागरिक, आजी-माजी सरपंच ,उपसरपंच त.मु.स.अध्यक्ष, पो.पाटील यांचा सत्कार 🔹 गावातील सैनिकांचा सन्मान व ‘जश्ने आजादी’सारखे राष्ट्रभक्तीपर कार्यक्रम 🔹 युवकांसाठी सैनिक प्रशिक्षण शिबिर व भव्य कबड्डी स्पर्धा 🔹 कोरोना काळात प्रवासी व गरजू नागरिकांना भोजन व जीवनावश्यक मदत महाराष्ट्र शासनाच्या गणेशोत्सव स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक! सन 2025 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या ‘पु. ल. देशपांडे गणेशोत्सव’ उपक्रमांतर्गत आयोजित गणेशोत्सव स्पर्धेत राधाकृष्ण गणेश उत्सव मंडळाने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मंडळाला ₹25000/-चे पारीतोषिक प्राप्त झाले. हा पुरस्कार केवळ एका मंडळाचा सन्मान नाही, तर गेल्या अनेक वर्षांपासून निस्वार्थ भावनेने समाजसेवा करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा गौरव आहे. उत्सव भक्तीचा… विचार समाजप्रबोधनाचा… संकल्प समाजसेवेचा… आणि भावना राष्ट्रभक्तीची! अवघ्या 300/- पासून सुरू झालेला हा प्रवास आज शासकीय पुरस्कारापर्यंत आणि असंख्य समाजोपयोगी उपक्रमांपर्यंत पोहोचला आहे. छोट्या प्रयत्नातून मोठे परिवर्तन घडवता येते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे राधाकृष्ण गणेश उत्सव मंडळ समाजसेवेची ही वाटचाल अशीच अविरत सुरू राहो, हीच श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना!
- Kind
- Tradition
- Place
- Maharashtra
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- राधाकृष्ण गणेश उत्सव मंडळ मुंडीपार
- Submitted
- 15 September 2026
- Accepted
- 15 September 2026
Evidence
This entry is record #291 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash680705357b6d5030a17d40e208624147e3a9a7d918379449d81f3c72ad840eff
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


