bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00279
पन्नास वर्षांची अनोखी बाप्पाची परंपरा

आमच्या घरच्या गणपतीची ५०वर्षे जुनी परंपरा आहे की गणेश चतुर्थी ला आणलेली बाप्पाची मुर्ती वर्षभर घरात रोज पूजा धूपदीप नैवेद्य दाखवून पूजली जाते त्याच्या पुढील गणेश चतुर्थीला नवीन मुर्ती व ही मागील वर्षाची मुर्ती दोन्हींची प्राणप्रतिष्ठा करून गेल्या वर्षीच्या मुर्तीचे विसर्जन करून नवीन मुर्ती फक्त घाटापर्यंत नेऊन आणून पुन्हा देवघरात वर्षभर ठेवली जाते अशी परंपरा गेली ५० वर्षे करत आलो आहोत याची सुरुवात माझ्या यजमानांच्या दोन वर्षे वयापासून झाली दहा दिवसांचा गणपती बसविल्यावर विसर्जनावेळी लहान मुलांना गणपती बाप्पाचे किती लाड करू असे होते आणि मग ते बाप्पाला निरोप देताना खूप रडू लागले आणि शेवटी बालहट्टा पुढे कोणाचे काय चालते विसर्जन घाटावर नेऊन सोपस्कार पूर्ण करून बाप्पाला पुन्हा घरी आणले व वर्षभर पूजा अर्चा चालू ठेवली पुढील वर्षी नवीन मुर्ती व हा बाप्पा असे दोघे भाऊ एकत्र गणेश चतुर्थी ला विराजमान झाले आणि त्याच्या दोन वर्षांनी यजमानांना भावाच्या रूपात गणपतीचा आशीर्वाद मिळाला अशी परंपरा आजही कायम आहे व राहील.
- Kind
- Story
- Place
- रावेत पिंपरी चिंचवड
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 15 September 2026
- Accepted
- 15 September 2026
Evidence
This entry is record #287 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash219d992dfdb12ef6e5b07d9340ea1aa16d4b24a235c1f2338d0fc93864e3b27d
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


