bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00271
बाप्पाची कृपा आणि संघर्षाची कहाणी

हि गोष्ट आहे 1991 चि . माझा जन्म 1987 मला त्यानंतरच जास्त काहि आठवत नाही मात्र मला 1991 चा काळ खूप छान आढवतो त्याच वर्षीपासून आमच्या घरात सर्व काही चांगल होत गेल. आमची खूप वाईट परिस्थिती होती.आम्हाला एके वेळेची भाकर पण खूप मेहनतीने मिळायची.माझे वडील आमच्या गावच्या चेयरमन च्या हाताखाली राशन वाटप करायचे पन वडिलांना जास्त काहि पगार नव्हता व आई बेरोजगार होती.सगळ घर वडिलांच्या पैशावर चालायचे 1993 साली जेव्हा गणपती बाप्पा आले तेव्हा आमची खूप इच्छा होती त्यांना घरी बसायची कारण या आगोदर आम्ही बसावलाच नव्हता कारण आमच्याकडे एवढे पैसे नव्हते आणि ह्या वर्षी पण फक्त माझ्या जिद्दी मूळे बाप्पा घरी आले. ते म्हणतात न 'भगवान के घर देर है अंधेर नहीं' हे मात्र खरं.त्याच्या दूसऱ्या दिवशी आमच्या घरी चेयरमन आले वडिलांना बोलले कि मी आता खूपच थकलो आहे. तू माझी रेशन ची दुकान सांभाळ.तूला तर माहितच आहे कस धान्य वाटायचं वगैरे. माझ्या वडिलांनी सर्वात पहिल गणपती चे दर्शन घेतले.माझ देखील शाळेत जास्त लक्ष नव्हत मी वडिलांच्या हाताखाली राशन वाटायचो आणि 2001 पासून 2026 हे काम मीच करतो वडिलांच्या हाताखाली राहून शीकलो.आणि मला आता कशाचीच आडचन नाही.गणपती बाप्पाच्या कृपेने माझ्या घरात सर्व काहि आहे सूख-सुविधा सर्व काही आहे. आमच्या सुखी संसारात मी,माझी आई, माझी पत्नी, व माझ्या 3 मुली म्हणजे माझ्या 3 लक्षुम्या आणि 1 मुलगा अगदी गणपती बाप्पा सारखा 'गणपती बाप्पा मोरया!
- Kind
- Story
- Place
- Maharashtra
- Art
- The Art of Victory (Vaijayikī vidyā) · Kala 64
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 15 September 2026
- Accepted
- 15 September 2026
Evidence
This entry is record #279 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash70b8669049c5e3b2cf0e9444ac9228f20c81cd63902de0ff2f539f68c9b90cb6
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


