bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00261
तेव्हाचे मंडळ

आम्ही जेव्हा मंडळांत होतो , तेव्हा काळ खूपच वेगळा होता,चौक तोच पण जागा वेगळी होती , तेव्हा मोबाईल आणि TV नसल्याने सर्व जन आरती आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायचे, आरती, भंजन, भारुड,कलापथक, कबड्डी , खोखो,लपाछुपी,लेझीम व आखाडा मधील डावपेच व काठी, असे सार्वजनिक खेळ चालायचे, लाईट गेली तर ढोल ताशा वादन करायचो, खूप गर्दी असायची खूप मजा यायची, बैलगाडी वरची ती मिरवणूक आजही आठवते ,मंडळाचा बजेट खूप छोटा असायचा, तरी ही भंडारा मात्र व्हायचा ,कारण तेव्हा सर्वांकडे मनाची श्रीमंती होती, जवळपास 35/40वर्ष झाली असावी आपल्या गणेश मंडळाला आजही गणेश मंडळ अविरत चालू आहे याचा आंनदच आहे, आमच्या वेळेस फोटो काढणे म्हणजे विशेष बाब होती, तरीही फोटो कुणाकडे तरी असतील मंडळाचे, सेवा केली कि मेवा मिळतोच त्यामुळे हि गणरायाची निस्वार्थ सेवा अंखड चालू ठेवा , याचं फळ स्वरुप मेवा तुम्हाला नक्कीच मिळेल,,,, गणपती बाप्पा मोरया
- Kind
- Story
- Place
- Maharashtra
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 15 September 2026
- Accepted
- 15 September 2026
Evidence
This entry is record #269 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashecd4f9c379307aa40feff769791787ddad5a9b86b9616ce8b1cb0cf129310ee6
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


