bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00228
श्री क्षेत्र पद्मालय गणपती देवस्थान मंदिर,पद्मालय ता. एरंडोल

श्री क्षेत्र पद्मालय गणपती देवस्थान मंदिर,पद्मालय ता. एरंडोल हे एक प्रसिद्ध गणपती मंदिर असून गणपती च्या अडीच शक्तिपीठ पैकी एक शक्तीपीठ म्हणून जळगाव जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.. हे मंदिर एरंडोल तालुक्यात असून एरंडोल पासून 11 km अंतरावर असून जळगाव येथून 30 किमी अंतरावर आहे. जवळ म्हसावद रेल्वे स्थानक असून ते 6किमी अंतरावर आहे.. येथे संकष्टी चतुर्थी दिवशी तसेच अंगारक चतुर्थी दिवशी लाखो संख्येने भाविक येथे दर्शन साठी येतात. या मंदिरात 2 गणपती असून डाव्या सोंडेचा गणपती आणि उजव्या सोंडेचा गणपती आहेत... त्यांची नावे आमोद आणि प्रमोद अशी आहेत..हे मंदिर पुरातन पेशवे कालीन मंदिर असून या मंदिर च्या समोर तलाव असून त्यात कमळाची फुले आहेत म्हणून या मंदिराला पद्मालय असे नाव पडले आहे.आपण एक वेळ अवश्य भेट द्यावी. गणपती बाप्पा मोरया 🙏🏻
- Kind
- Tradition
- Place
- Maharashtra
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 15 September 2026
- Accepted
- 15 September 2026
Evidence
This entry is record #235 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash3029f1d842b77f498c73a70834799305e480770511ddba8909c3f97607e93198
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


