bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00212
बाप्पा, आमच्या स्वप्नांचा पेपर वाचव!
आमच्या गणपती सजावटीची थीम MPSC परीक्षेतील पेपर लीक आणि त्याचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम यावर आधारित आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थी MPSC परीक्षेसाठी अनेक वर्षे मेहनत करतात. आर्थिक अडचणी, अपयश आणि अनेक अडथळे पार करून ते अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतात. मात्र पेपर लीकसारख्या घटनांमुळे त्यांच्या मेहनतीवर आणि संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. या सजावटीत विद्यार्थ्यांची मेहनत, त्यांची स्वप्ने, पेपर लीकमुळे झालेला अन्याय आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्थेची गरज दाखवण्यात येणार आहे. गणपती बाप्पाला ‘विघ्नहर्ता’ मानले जाते. त्यामुळे या माध्यमातून समाजातील भ्रष्टाचार, गैरप्रकार आणि अन्यायाचे विघ्न दूर करण्याचा संदेश देण्यात येईल.
- Kind
- Story
- Place
- Maharashtra
- Art
- Architecture (Vāstu-vidyā) · Kala 29
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 15 September 2026
- Accepted
- 15 September 2026
Evidence
This entry is record #219 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashca5d90e04d8ee2266aeb519dbabf4548bd160a8af0254802aac7b79f257675ab
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


