bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00166
श्री चे आगमन एक सोहळा
1वयाच्या 15 वर्षांपासून तर आज पर्यंत घरात कॉलनी मधे गणपती ची वर्गणी पासून विसर्जनापर्यंत घरात आणि कॉलनी मधे नियोजन करण्यात व्यस्त. घरातला उत्सव आणि कॉलनी मधील उत्सव या दोन्ही कडे आम्ही बच्चे मंडळी असताना कायम उत्साहाचे वातावरण शाळेतून आल्यावर कॉलनीच्या सम्राट गणेश मंडळातील संध्याकाळ च्या आरती ची तयारी आरती जोरदार झाली पाहिजे यासाठी सर्वांना घरी जाऊन जाऊन बोलाऊन आणणे सर्व जमल्यावर किमान 3 आरती आणि," घालिन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझे" म्हणत भक्तिभावसह उत्साह आजही कायम आहे. बाप्पा चा उत्सव म्हणजे मित्र असलेल्या देवासह घालवलेले सुंदर दिवस. या उत्सवात नियोजन, कार्यक्रमाचे आयोजन, सर्वांना सोबत घेऊन केलेले काम, सर्वांच्या इच्छेनुसार सर्व विधिवत सोपस्कार, विसर्जन मिरवणूक तापी नदीवरील विसर्जन सोहळा ज्यामध्ये सर्व कॉलनीमधील आबाल वृद्ध यांचा सहभाग आणि बाप्पाला या वर्षी पुरता निरोप देण्यासाठी ची शेवटची आरती दरवर्षी चा हा पायंडा अजूनही कायम आहे. आणि हाच निर्मळ उत्सव भक्तिभावाने सर्व देशात साजरा होत आहे. हा महाराष्ट्राचा गणेश उत्सव आज भारताचा राष्ट्रीय उत्सव व्हावा हीच गणरायाचे चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया
- Kind
- Story
- Place
- Maharashtra
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 15 September 2026
- Accepted
- 15 September 2026
Evidence
This entry is record #173 in a hash chain of 2,052. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashc74c4bda5c97c0d4f897008638f207f0ad8df55efca286133e3fd291f568d484
Chain head6cfde45facf2c7d15766904589c11b07e9a88db585a4b39a48fb988e8813e408
The chain verifies end to end as of this page load.


