bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00139
घरचा गणपती बाप्पा

1997 साली माझ्या पतीने गणपती बाप्पा घरी विराजमान करण्यास सुरुवात केली होती, त्या काळात त्यांच्या वडिलांची परिस्थिती जेमतेम होती, परंतु माझे पती हे इयत्ता पाचवीत शिकत होते व गणपती बाप्पा घरी बनविण्यासाठी खूप हट्ट धरून बसले होते परंतु परिस्थिती पुढे काही नसते त्यामुळे घरून नकार मिळाला, कारण घरात फक्त बाप्पा ची मूर्ती विराजमान करून चालणार नव्हते तर दहा दिवस बापाची सेवा करणे घरात त्यासाठी नैवेद्य वैगरे बनविण्यासाठी पुरेसे साहित्य नसे व त्यासाठी खर्च परवडण्याजोगे नव्हते त्यामुळे घरून स्पष्ट नकार मिळाला त्यांना, परंतु हे सर्व कदाचित बाप्पा बघत असावेत म्हणुन माझे पती जे त्यावेळी इयत्ता पाचवीत शिकत होते ते ज्या गावी राहत होते त्या छोट्याश्या गावात बाजारपेठेत फेरफटका मारत असताना त्यांना एका दुकानात बापाच्या मुर्ती दिसल्या व ते उत्सुकता म्हणून मूर्ती बघत उभे राहिले होते, त्यावेळी दुकानदार स्वतः माझ्या पतीच्या जवळ येऊन बापाची एक मूर्ती घेऊन जाण्यासाठी आग्रह करू लागला परंतु माझ्या पतीने पैसे नसल्याचे कारण सांगून नकार दिला, गम्मत बघा त्या दुकानदाराने इतका हट्ट केला की माझे पती हे एक बालक असतानाही घरी कुठलीही विचारणा न करता त्या व्यक्तीने बाप्पा ची मूर्ती आणि घरात लागणार असलेल्या सर्व खाद्यपदार्थांच्या वस्तू उधार म्हणून दिल्या व माझ्या पतीला सांगितले की तुला जस जमेल तस तु पैसे आणून दे काही काळजी करू नकोस, व माझे पती बापाला घरी घेऊन आले व घरातील वातावरण आनंदी आनंद झाले.
- Kind
- Story
- Place
- नाशिक
- Art
- The Art of Victory (Vaijayikī vidyā) · Kala 64
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 15 September 2026
- Accepted
- 15 September 2026
Evidence
This entry is record #145 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash3e6ac88a215f8c9086c74f4e8fcbcb3dfc9cf4991d26e3275f8d87048544b555
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


