bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00101
पाटलांचा गणपती
गाव:- पडळी ता. राधानगरी जि. कोल्हापूर हे गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आहे. गावा शाहू महाराजांनी बांधलेल्या राधानगरी धरणाच्या खालच्या बाजूस वसलेले आहे. जुने गाव न्यू कारंजे येथून आजोबा पासून त्यावेळच्या मातीच्या घरातून झालेली गणपतीची परंपरा आज नातवा पर्यंत पोहचली आहे. जुन्या गावातून एकत्र कुटुंबात हा गणपती १९५० पर्यंत पाटलांच्या मूळ घरात साजरा केला जात होता.व यानंतर प्रत्येक कुटुंब जशी वाढीस लागली व स्वतंत्र घरे झाली तशी त्या त्या कुटुंबात हा सण साजरा करण्यात येत आहे.यानंतर दाजीपूर अभयारण्य पुनर्वसन प्रकिये मुळे पडळी गावात स्थलांतर झाले तरी देखील मातीच्या घरातून त्यावेळच्या परिस्थितीतून सुरू झालेला गणपती उत्सव चालू आहे. घाट माथ्यावर असून सुद्धा अगदी लागून असलेल्या तळ कोकणचा प्रभाव या गावांवर आहे. यामुळेच आमचे सर्वच सन कोकणातील पद्धतीने साजरे होतात. जसे की गणपती माटी बांधणे या मातीला त्यावेळी आरस म्हणुन बांधली जाणारी निसर्गात उपलब्ध होणारी पाने,फुले, फळे आजही बांधली जातात. परंतु ह्या गोष्टी पुढील गावात पहायला मिळत नाहीत. या गणेश उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे आमच्या पाटलांच्या मूळ घरात गौरी निमित्त महिलांचे खेळले जाणारे विविध खेळ, पारंपरिक गाणी रात्रभर गायली जायची. गावात सर्वाचा घरी भजने, आरत्या गायल्या जायच्या व आजही गायल्या जातात. आजही आमचे सर्व कुटुंब एकत्र येऊन हा गणेश चतुर्थी उत्सव साजरा करत आहे. यामुळे घरात एक वेगळेच अल्हाद दायक वातावरण निर्माण होते. आता या उत्सवाला नव्या पिढीचा आधुनिक कल्पनाच जोड असला आहे. तरी देखील जुन्या परंपरा तेवढ्याच तोडीने आजची नवीन पिढी सांभाळत आहे. या गणेश उत्सवाच्या काळात ववशे भरणे, आपल्या निसर्गातील रान भाज्यांचा आस्वाद देखील आजच्या गणपती सणात आमच्या घरात घेतला जातो. या सणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण गौरी गणपती विसर्जन पर्यंत साजरा होतो व विसर्जनाच्या दिवशी सर्व गावातील घरांचे एकत्रित गणपती वाजत गाजत विसर्जन स्थळी नेले जातात व तिथे सामूहिक आरती व विसर्जना नंतर सामूहिक प्रसाद एकत्र करून सर्वाना दिला जातो. असा आमचा पाटलांचा गणपती उत्सव साजरा केला जातो.
- Kind
- Story
- Place
- Maharashtra
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- संदीप पाटील
- Submitted
- 15 September 2026
- Accepted
- 15 September 2026
Evidence
This entry is record #107 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash6dd131f422fe8e40344acf93d84b52ab1fa1b2d8a7ca3b00d294a0d60e6e41c6
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


