bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00072
Eco friendly Ganesha Workshop
साईनगर गणेश उत्सव मित्र मंडळाने महापालिका सचीव श्री विश्वनाथ तळेकर यांचा मार्गदर्शनाखाली आज दि १३ सप्टेंबर २०२६ रोजी दू ३ ते साय ६ या वेळेत वसई विभागातील लहान मुलांसाठी श्री गणरायांची मूर्ती तयार करण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली होती . सदर प्रशिक्षण शिबिरात शहरातील शहरातील ४० मुला आणि मुलीने सहभाग घेतला. या शिबिरात सहभागी झालेल्या सर्वाना श्री गणरायांची मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिरात खोचवड्याचे रहिवाशी श्री रूपेश राऊत उर्फ ओम् स्वामी यांनी प्रशिक्षण दिले. शिबिराला थोड समाजसेवक श्री सुशील ओगले यांनी सहकार्य केले. शिबिरात सहभाग नोंदविलेल्या मुलांनी शिबिर आयोजित केल्याबद्दल मंडळाचे आभार आणि आनंद व्यक्त केला. पुढील वर्षी या मुलांनी शाडूच्या मुर्त्या बनवून या मुर्त्या लोकाना उपलब्ध करून द्यावे म्हणजे पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल असे मत विश्वनाथ तळेकर यांनी व्यक्त केले
- Kind
- Story
- Place
- Maharashtra
- Art
- Children's Toys (Bālaka-krīḍanaka) · Kala 33
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 14 September 2026
- Accepted
- 14 September 2026
Evidence
This entry is record #78 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashd8e2e8fab189ba39b8a4cca5e7925167304e45a41683f3a916eac009ebaee66d
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


