bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00044
बांबूचा गणपती

चंद्रपूर: जिल्हा माहिती कार्यालय बांबूपासून साकारला बाप्पा; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश बीआरटीसीच्या विद्यार्थ्यांचा ‘बांबू टू बाप्पा’ अभिनव उपक्रम चंद्रपूर, दि. 14 : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बीआरटीसी) चिचपल्ली येथील विद्यार्थ्यांनी चक्क बांबूपासून आकर्षक श्री गणेशमूर्ती साकारली आहे. ‘बांबूटूबाप्पा’ या अभिनव उपक्रमातून तयार करण्यात आलेल्या या गणेशमूर्तीची विधिवत स्थापना करून केंद्रात ‘जागतिक बांबू सप्ताह २०२६’चा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र वन विभागाच्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात 14 ते 18 सप्टेंबर या कालावधीत ‘जागतिक बांबू सप्ताह २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी ‘डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी’च्या विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या तयार केलेली बांबूची गणेशमूर्ती विशेष आकर्षण ठरली. बांबूपासून पर्यावरणपूरक आणि कलात्मक गणेशमूर्ती साकारून विद्यार्थ्यांनी परंपरा, पर्यावरण संवर्धन आणि आधुनिक बांबू तंत्रज्ञानाचा अनोखा संगम घडवून आणला आहे. बांबूचा उपयोग केवळ पारंपरिक वस्तू तयार करण्यापुरता मर्यादित नसून आधुनिक डिझाईन, कलाकृती, शाश्वत उत्पादने आणि उद्योजकतेसाठीही प्रभावीपणे होऊ शकतो, असा संदेश या गणेशमूर्तीच्या माध्यमातून देण्यात आला. या उपक्रमामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या संकल्पनेलाही नवे स्वरूप मिळाले आहे. निसर्गाशी सुसंगत असलेल्या बांबूचा कल्पकतेने वापर करून विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘बांबूचा बाप्पा’ उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. विद्यार्थ्यांच्या कल्पकता आणि कौशल्याचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमाला बीआरटीसीचे संचालक उमेश वर्मा, वनक्षेत्रपाल सतीश शेंडे, चिचपल्लीचे सरपंच चंदन उचेकर, न्यू एरा क्लिनिक सोल्युशनचे सचिन धात्रक आणि बीआरटीसीचे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बांबू हे ‘हरित सोने’ असून बांबूवर आधारित पर्यावरणपूरक उत्पादने, कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण उद्योजकतेच्या माध्यमातून शाश्वत आर्थिक विकासाला मोठी चालना मिळू शकते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. 000000
- Kind
- Story
- Place
- Maharashtra
- Art
- Cane and Wicker Work (Paṭṭikā-vetra-bāṇa-vikalpa) · Kala 30
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 14 September 2026
- Accepted
- 14 September 2026
Evidence
This entry is record #50 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash13da3fe7c90c13896a4c9cb43c462d67a9488b7ac8d098d1616519a6bb54f038
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


