bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00015
गणेशोत्सव रेगे परिवाराचा

🌺 आमचा गणेशोत्सव — परंपरेचा आणि नात्यांचा वारसा 🌺 शांताराम सिताराम रेगे हे आमचे पणजोबा. ज्ञात असलेल्या माहितीनुसार, त्यांनी आणि त्यांच्या पूर्वजांनी सुरू केलेला हा गणेशोत्सवाचा वारसा आजही आमच्या कुटुंबात श्रद्धेने आणि आनंदाने सुरू आहे. काळ बदलला, कुटुंबाच्या पुढच्या पिढ्या विविध ठिकाणी विखुरल्या, प्रत्येकाची आपापली जबाबदारी आणि जीवनाची वाट वेगळी झाली… पण गणपती बाप्पाच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा एकत्र येतो. ही केवळ पूजा किंवा उत्सवाची परंपरा नाही; ही आहे आपल्या पूर्वजांनी दिलेली संस्कृती, श्रद्धा, कुटुंबीयांची एकजूट आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणारा अमूल्य वारसा. दरवर्षी बाप्पाच्या चरणी एकत्र येताना मनात एकच भावना असते— परंपरा जपूया, नाती जोडूया आणि हा वारसा पुढच्या पिढीकडे अभिमानाने सोपवूया. 🙏 गणपती बाप्पा मोरया! 🌺🙏 रेगे परिवाराचा गणेशोत्सव — पिढ्यान्पिढ्यांची श्रद्धा, एकतेची परंपरा.
- Kind
- Story
- Place
- Maharashtra
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 14 September 2026
- Accepted
- 14 September 2026
Evidence
This entry is record #21 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashf2336725ce76535bd5f6232535b6c31fb5458a00ec88a04106887b00e4e098ff
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


