bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00003
आमच्या घरचा बाप्पा

वर्षातून एकदा येतो… पण वर्षभर मनात राहतो, मातीच्या मूर्तीतून आमच्या घरात प्रेम, आनंद आणि आशीर्वाद घेऊन येतो. 🌺 बाप्पांच्या आगमनाआधी घराची साफसफाई, सुंदर रांगोळी आणि सजावट सुरू होते. आईची मनापासून केलेली पूजा, आजीने जपलेली परंपरा, आणि संपूर्ण कुटुंबाने एकत्र केलेली आरती— यातच आमच्या घरच्या गणपती उत्सवाचं खरं सौंदर्य आहे. **बाप्पा येतात दहा दिवसांसाठी, पण देऊन जातात आयुष्यभर पुरेल एवढ्या आठवणी… आपल्या घराला एकत्र आणायला येतात. दहा दिवस कधी निघून जातात कळतही नाही… विसर्जनाच्या वेळी डोळ्यांत अश्रू असतात, पण मनात एक विश्वास असतो— “बाप्पा जात नाहीत… ते फक्त पुढच्या वर्षी पुन्हा येण्याचं वचन देऊन जातात.”
- Kind
- Story
- Place
- Maharashtra
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Shree
- Submitted
- 12 September 2026
- Accepted
- 12 September 2026
Evidence
This entry is record #8 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash631433f55e685b328975b5b5ff2e1580802422bd84d1ed79ca6786ecb84dd6d7
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


