bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00002
शेळके परिवाराचा गणपती

हे घराणे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील असून सध्या धुळे फागणे येथे वास्तव्य करतात... कवी प्रभाकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली येथील संपूर्ण परंपरा व रूढी चालत आलेले आहे... गणेशोत्सवामध्ये या घराण्याचा दहा दिवसांचा गणपती असतो... पहिल्या दिवशी आवाहन केले जाते व शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा केली जाते त्यामध्ये सत्यनारायण केला जात असतो या संपूर्ण दहा दिवसांमध्ये प्रातःकाली गणपतीला सेवा देतात दररोज पाठ अथर्वशीर्षाची पठण होत असते शेवटच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला गणपतीला दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो तसेच उत्तर पूजा करून पूर्ण घराच्या प्रदक्षिणा घालून गणपतीचे विसर्जन केले जाते... गणेशोत्सवाशिवाय दुसरा महत्त्वाचा सण म्हणजे दसरा नवरात्र नवरात्रीमध्ये घट पूजा केली जाते तुळजाभवानी देवीच्या आराधना करून शेवटच्या दिवशी खंडोबाचा देवीचा तरी तळी भंडार केला जात असतो. दसऱ्याच्या दिवशी पारंपारिक शास्त्रांची पूजन केले जाते व देवाला मांसाहाराचा नैवेद्य दिला जातो
- Kind
- Tradition
- Place
- Maharashtra
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 12 September 2026
- Accepted
- 12 September 2026
Evidence
This entry is record #7 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash9359b3272706aed2419c02a678d185a032ce44f6b572aed1e2e508d56758499a
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


